Fri. Jan 28th, 2022

13 वर्षांच्या मुलाची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या

आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या 13 वर्षांच्या मुलाने राहत्या घरी गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे. आयमॅक्स थिएटरजवळील गिरनार टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. वडाळा येथे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

वडाळा येथे एका 13  वर्षांच्या मुलाने राहत्या घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आयमॅक्स थिएटरजवळील गिरनार टॉवरमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

रियान चक्रवर्ती असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.  दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रियानचे वडील शेअर मार्केटमध्ये, तर आई बँकेत नोकरीला आहे.  या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

परंतु दिवसेंदिवस या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *