Mon. Jan 24th, 2022

वीज खंडीत केल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. वीज न भरलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई राज्यसरकारकडून करण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याच्या वीज तोडणीमुळे पीकाचे नुकसान झाल्यामुळे आम्तहत्या केली आहे.

कृष्णा राजाभाऊ गायके (वयवर्ष २३) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावाचा वीज पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडीत करण्यात आला. सक्तीची वीज बिल वसुलीमुळे शेतकरी संतापला होता. आणि त्यामुळे शेती कशी करावी या विवंचनेतून कृष्णाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बीडमधील कृष्णा राजाभाऊ गायके या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे बीडमधील परिसरात खळबळ उडाली असून महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *