Fri. Jan 28th, 2022

नाशिकमध्ये पोलीस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत्महत्या

   पोलीस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पोलीस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  राहुल चौगुले वय वर्षे २२ असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कोरोना काळात पोलीस विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. त्यातच पोलीस भरतीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दोन वर्षापासून पोलीस भरती परीक्षा रखडल्याने राहुल नैराश्यात गेला. मागील आठवड्यात पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात आली. आणि लगेचच ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत राहुलला कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला. त्यामुळे राहुलची मानसिक अवस्था खलावली असून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलून विषारी औषधाचे सेवन केले. त्यानंतर त्याला त्रास सुरू झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *