Sun. Oct 24th, 2021

पालघरमध्ये गरिबीला कंटाळून आईची दोन मुलींसह आत्महत्या

गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पालघर मधील जव्हारमध्ये घडली आहे. जूनमध्ये कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

यानंतर रुक्षणा हिने स्वत: चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा या विवंचनेतून ३ वर्षीय दीपाली आणि ७ ते ८ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून आपली जीवन यात्रा संपवली मात्र चिमुकल्या वृषालीचा जीव यात वाचला आहे.

नेमकं काय घडलं?

5 जून रोजी रुक्षिणा (30) राहणार खरोंडा हिने स्वतः विष प्राशन करून आपल्या दोन चिमुकल्यांना ही पाजलं.

यामध्ये मोठी मुलगी आणि रुक्षिणा हिचा मृत्यू झाला तर 7 ते 8 महिन्यांची चिमूकली मात्र बचावली आहे.

चिमुकल्या वृषालीवर जव्हार कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जूनमध्ये कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे हाताला रोजगार नाही, मुलीना जगवायचे कसे, या प्रश्नातून या सर्व कुटुंबानेच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

रोजगात हमी, घरकुल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना सरकार आदिवासींसाठी शासन राबवित आहे.

मात्र या योजना किती पोकळ आहेत त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरून समोर आले आहे.

या आत्महत्येस जबाबदार सर्वच यंत्रणा प्रमुखांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *