Sun. May 16th, 2021

डॉ.पायल तडवी सुसाइड नोट मधून पायलने केले ‘हे’आरोप

डॉ.पायलने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. पायलची सुसाइड नोट समोर आल्याने या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे.

डॉ.पायलने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी तीन वरिष्ठ डॉक्टरांना  अटक करण्यात आली होती. याप्रकरणाला आता वेगळ वळण लागलं आहे. पायलची सुसाइड नोट समोर आल्याने या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे.

काय आहे पायलच्या सुसाइड नोट मध्ये?

आई बाबा मला माफ करा,मला एक चांगली डॉक्टर व्हायचं होतं. मात्र या लोकांनी मला खूप त्रास दिला.

आता त्रास सहन करण्याची क्षमता संपली आहे. मला प्रत्येक पावलावर त्रास दिला जातोय.

मला माझं कामही करु दिलं जात नाहीये. माझे सीनिअर मला काहीच करु देत नाही.

मला कुठलंच काम करु दिलं जात नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये मला जाऊ देत नाही.

मला दरवेळी ओपीडीमध्ये पाठवलं जातं.माझा भयंकर मानसिक छळ केला जातोय.

त्यामुळे आत्महत्येचं पाऊल मी उचलत आहे. माझ्या मृत्यूला या तीन महिला डॉक्टर जबाबदार आहेत.आई मला माफ कर…

दरम्यान या खटल्याची सुनावणी 30 जुलै निर्धारित करण्यात आली आहे. या सुसाईड नोटमुळे या केसला वेगळ वळण लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *