Tue. Mar 31st, 2020

प्रसिद्ध सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीची आत्महत्या

दिल्लीत प्रसिद्ध सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसिद्ध सायकल कंपनी एटलास कंपनीचे मालक संजय कपूर यांच्या पत्नीने आत्महत्या करुन आपला जीवन प्रवास संपवला आहे. त्या ५७ वयाच्या होत्या.

आत्महत्या केलेल्या महिलाचा मृतदेह संश्यास्पद परिस्थितीत आढळून आला. दिल्ली पोलिस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत.

प्राथमिक चौकशी वरुन ही आत्महत्या असल्याचं पोलिसांकडून सांगितले जात आहे. परंतु घराचा दरवाजा उघडा असल्याने पोलीस या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

दिल्लीतील औरंगजेब लेनमधील कोठी येथे नताशा कपूर यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.

पोलिसांनुसार नताशा कपूर या आपल्या जीवनात आनंदी नसल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिलं होतं.

आर्थिक चणचणीला वैतागून ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

नवी दिल्लीतील तुगलक रोड पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे.

बुधवारी नताशा कपूर यांचे मृतदेहाचे शवविच्छेदन आरएमएल रुग्णालयात करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर नताशा कपूर यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सूपूर्द करण्यात आला. बुधवारी लोधी रोडी येथील स्माशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

नक्की काय घडलं ?

मंगळावारी दुपारी जेव्हा नताशा कपूर जेवल्या नाहीत, त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. सिद्धांत कपूर ( मुलगा) याने आईला (नताशा कपूर) यांना फोन केला. परंतु आईने मुलाचा कॉल घेतला नाही.

यानंतर घरातील एका कोपऱ्यात पंख्यांने लटकलेला मृतदेह आढळला. नताशा कपूर यांनी स्वत:ला लटकवून घेतलं होतं. कुटुंबियांनी नताशाला खाली उतरवलं.

यानंतर कुटुंबियांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी नताशाला मृत घोषित केलं. सिद्धांत कपूरने पोलिसांना यासर्व प्रकरणाची माहिती मंगळवारी संध्याकाळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *