Sat. Sep 21st, 2019

..म्हणून तिने केली दोन चिमुकल्यासह आत्महत्या

0Shares

सासरच्या त्रासाला कंटाळुन सुनेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्पना अंकुश चव्हाण (25) मुलगा युवराज (5) मुलगी गुडिया (3) अशी मृतांची नावे आहेत. आपल्या दोन चिमुकल्यांसह तालुका दारव्हा येथून आपल्या माहेरी मांडवा या गावी आली होती. या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

सासरच्या त्रासाला कंटाळुन कल्पना चव्हाण हिने आत्महत्या केली आहे.

सासरच्या मंडळींकडून तिला त्रास दिला जायचा असं बोललं जात आहे.

कल्पना आपल्या दोन्ही मुलांना घेवून माहेरी आली होती.

माहेरी एका शेतातील विहिरीत चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे.

कल्पना अंकुश चव्हाण (25) मुलगा युवराज (5) मुलगी गुडिया (3) अशी मृतांची नावे आहेत.

दिग्रस पोलीस स्टेशनला महिलेचे पती ड्राइवर अंकुश चव्हाण विरुद्ध तक्रार देण्यात आली

या घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *