Fri. Jan 21st, 2022

सुजय विखे-पाटलांचा भाजपात प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच असल्यामुळे डॉ सुजय विखे -पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे कल्बमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे पाटील यांनी प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते उपस्थित होते. भाजपाचा विजय असो अशी घोषणाबाजी करत सुजय विखे पाटील यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे गरवारे कल्बमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष बघायला मिळाला.

पक्षात प्रवेश करताना सुजय विखे पाटील काय म्हणाले ?

विधानसभेतील विरोधा पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आहेत.

यावेळी सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असून वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं आहे.

तसेच पुढील वाटचालीसाठी भाजप हा योग्य पक्ष असल्याचे त्यांनी आपले मत मांडले.

मुख्यमंत्र्यांचा आधार हा वडिलांप्रमाणे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

भाजपात प्रवेश करण्याचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले सुजय विखेंचे पक्षात स्वागत –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मोठी घोषणाही केली आहे.

सुजय विखे पाटील यांना नगर लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे.

पक्षात प्रवेश करताना सुजय विखे पाटील यांनी कुठल्याही प्रकारची अट ठेवली नव्हती असे सांगितले.

तसेच नगर जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

नगरची जागा विक्रमी मताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *