Mon. May 10th, 2021

शेतकरी सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्हं

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

शेतकरी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांकरता शेतकरी आंदोलनाला दिशा देण्याकरता तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीत फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. सुकाणू समितीतील सदस्य डॉ. गिरीधर पाटील यांनी समिती अंधारात ठेवून निर्णय घेत असल्याचा थेट आरोप केला.

 

आज पार पडणाऱ्या सुकाणू समितीला न जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे सुकाणू समितीच्या एकूणच कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. समितीच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेतही समन्वयाचा अभाव असल्याची खोचक टीकासुद्धा त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *