नागपूरातील प्रा. मल्हारी मस्के मारहाण प्रकरणातील आरोपी भाजप कार्यकर्त्याला सशर्त जामीन मंजूर
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
नागपूरमधील बहुचर्चित प्राध्यापक मल्हारी मस्के मारहाण प्रकरणातील आरोपी सुमित ठाकूरला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
जामीन देतांना न्यायालयाने सुमित ठाकूरला शहरबंदी लावली आहे. पोलिसांच्या परवानगीनंतरच सुमित ठाकूरला शहरात प्रवेश करण्याचे आदेश दिले.
सुमितवरील आरोप मोक्काच्या कक्षेत येत नसल्याने सुमित ठाकूरला जमीन मिळाला आहे. 16 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या वादात सुमित ठाकूरने प्रा. मल्हारी मस्केंना मारहाण करून त्यांची गाडी पेटवून दिली होती.
गुन्हा दाखल करू नये यासाठी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन राडा केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमित ठाकूरवर मोक्का लावून वर्धा जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथून अटक केली होती.