Jaimaharashtra news

सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

मुंबई: भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. कोणत्याही अटीशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची कबुली स्वतः डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. भाजपामध्ये जाण्या अगोदर काँग्रेसची सत्ता असताना सुनील देशमुख राज्यमंत्री होते. उद्या, १९ जूनला मुंबई येथे त्यांचा काँग्रेसमध्ये घरवापसी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नुकतेच अमरावती मध्ये येऊन गेले याच दरम्यान नाना पटोले आणि सुनील देशमुख यांची चर्चा झाली या चर्चेतच सुनील देशमुख यांची घरवापसी निश्चित झाली.अमरावती मतदारसंघात सुलभा खोडके काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. सुनील देशमुख यांना हरवून त्या २०१९ मध्ये आमदार झाल्या होत्या.

Exit mobile version