Fri. Jan 21st, 2022

हे भाजपचं नव्हे, सत्तेचं आकर्षण आहे, तटकरेंची सुजय विखेंवर टीका!

सुजय विखे पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सडकून टीका केली आहे. हे भाजपचं आकर्षण नसून हे लोकसभेच्या सत्तेचं आकर्षण असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय. गुहागर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी तटकरे यांनी हे आरोप केले

“इथे विचाराचा लवलेश नाहीये, ध्येयवादाचा विचार नाही, तत्वनिष्ठेवर राजकारण नको त्याचा विचार नाही. इतका विरोधाभास असलेल़्या राजकीय संस्कृतीमध्ये जाण याच मुख्य कारण सत्ता हेच आहे असं खेदाने म्हणावं लागेल” असही सुनील तटकरे म्हणाले.

शरद पवार यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथम सांगितले होते की आमच्या कुटुंबातील केवळ 2 जण उमेदवार असतील.

माढा येथील जनतेची इच्छा होती की पवार साहेबांनी तेथील उमेदवारी करावी.

इकडे मावळ मतदार संघ आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.

मात्र तरुणांना उमेदवारी मिळावी म्हणून ही माघार आहे.

पवार साहेबांनी नेहमीच इतरांचा सातत्याने विचार केला म्हणूनच ते माढा मधून उमेदवारी करणार नाहीत असे त्यांनी घोषित केलं.

हे आमच्या सर्वांसाठी नक्कीच क्लेशकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *