सनी लिओनी इमोशनल पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत

सनी लिओनीचा मुलगा असं काही बोलला की जे ऐकताच तिच्या डोळ्यात टचकन आलं पाणी! बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या बोल्ड अंदाजसाठी ओळखल्या जाते. सनी अनेकवेळा तिच्या मुलासोबत आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्याच्या घडीला सनी ही तिच्या इमोशनल पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सनीने नुकताच एक फोटो आणि पोस्ट इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यात तिने अशरशी झालेल्या संपूर्ण संभाषणा सांगितले आहे. यामध्ये सनीने असं म्हटलं आहे की, मुलाने आपल्या एका प्रश्नावर असं उत्तर दिले की हे ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यांत अश्रू आले.

या फोटोत सनीचा मुलगा बागेत बसलेला दिसतोय आणि फोटोसोबत तिने अशरसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे, हे ऐकून सनी इमोशनल झाली. सनी लिहितो की- मी विचारले, तुला इतके सुंदर कोणी बनवले आहे? मुलगा म्हणाला- तू बनवले आहेस आई.. सनी म्हणतो की माझ्या मुलाचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. लॉकडाऊन दरम्यान सनी लिओनी बर्याचदा आपल्या मुलांसोबतचे फोटो हे इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत होती आणि या काळात सनीने तिच्या कुटुंबसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सनी मुलांसोबत मजा मस्ती करताना दिसते.

Exit mobile version