Wed. May 19th, 2021

सनी लिओनीचा ‘नागीन डान्स’, सपना चौधरीला आव्हान!

भारतीय वंशाची कॅनेडियन पॉर्नस्टार सनी लिओनी आता जरी बॉलिवूडमध्ये गाजत असली, तरी अजूनही तिला अभिनयक्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र सनी लिओनी ही वेबसीरिज आणि आयटम साँग्जमुळे जास्त प्रसिद्धी मिळतेय. आताही तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या Tik Tok या app वर सनी लिओनीचा ‘नागीन डान्स’ viral होतोय. या व्हिडिओला लाखो views मिळाले आहेत.

सनी लिओनीचा डान्स viral!

‘तेरी अखियोंका यो काजल’ या गाण्यावर सनी लिओनीने भन्नाट ‘नागीन डान्स’ केला आहे. यापूर्वीही तिचा तिच्या पतीसोबतचा डान्स व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. तसंच एका रेडिओ स्टेशनच्या मुलाखतीदरम्यान केलेल्या मजामस्तीचा व्हिडिओहीतिने शेअर केला होता. त्या व्हिडिओलाही चांगले व्हूज मिळाले होते.

 

सपना चौधरीला आव्हान!

मात्र आता ‘नागीन डान्स’च्या व्हिडिओमुळे सनी लिओनी ही सपना चौधरीला आव्हान देत असल्याची चर्चा नेटीझन्समध्ये रंगली आहे.

कारण तेरी अखियों का यो काजल हे गाणं सपना चौधरीचं असून ती या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रिय झाली.

मात्र आता सनीने तिचाच डान्स केल्यामुळे तिच्यापेक्षा सनीचा डान्स जास्त popular  होतोय का, असा सवाल निर्माण होतोय.

 

बघा Sunny Leone चा भन्नाट नागीन डान्स!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *