Fri. Jun 5th, 2020

मुंबईच्या सन्नी पवारला न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार

मुंबईतील 11 वर्षीय सनी पवार याने पुन्हा एकदा परदेशात भारताचे नाव उंचावले आहे. सनी पवारला 19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोकृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड त्याला मिळाला आहे. सनीने ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या ‘लायन’ या हॉलिवूडपटात काम केले आहे. ‘लायन’ हा 2016 मधील ऑस्कर नामांकित सिनेमा आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सनीची उंच झेप

मुंबईच्या सन्नी पवारचा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये भारताचे नाव  उंचावले.

हा सर्वोत्कृष्ट बाल कलाकार मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहतो

सन्नी पवार हा अवघ्या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

19 व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे.

‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या 2016 मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

पुरस्कारानंतर सनीच्या भावना

पुरस्कार मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. याचे सर्व श्रेय माझ्या  आई- वडिलांना जाते.

मला रजनीकांत  सारखा  मोठा कलाकार व्हायचं आहे.

माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल असे काम करायचे आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *