Tue. Jun 15th, 2021

IPL 2019 : हैदराबादची 5 गडी राखून दिल्लीवर मात

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबादच्या सामन्यात हैदराबादने 5 गडी राखून विजय मिळवला.सामन्याचा नाणेफेक जिंकून हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकात 8 बाद 129 धावा केल्या होत्या.या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला या विजयासोबतचं सनरायझर्स हैदराबाद संघाने गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान मिळवलं आहे.

दिल्लीने 20 षटकात 8 बाद 129 धावा

सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी  सुरुवात केली .

शॉ ने 11  चेंडूत 2  चौकार लगावत 11  धावा केल्या.कर्णधार श्रेयस अय्यरने 41  चेंडूत 43 धावा केल्या.

ऋषभ पंत अवघ्या 5  धावा करून तंबूत परतला

कॉलिन इन्ग्रॅम 8 धावांवर माघारी परतल्याने दिल्लीला पाचवा धक्का बसला.

राहुल तेवतीया  देखील 7  चेंडूत 5  धावा करून झेलबाद झाला.

अय्यरने 41 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 43  धावा केल्या

दिल्लीने20  षटकात 8  बाद 129 धावा केल्या.

हैदराबादने पाच गडी राखून विजय

हैदराबादने तडाखेबाज सुरुवात केली आणि केवळ 32 चेंडूत अर्धशतक केले.त्याने 28  चेंडूत 48  धावा केल्या.

फटकेबाजीच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर झेलबाद झाला  त्याने 18 चेंडूत 10 धावा केल्या.

मनीष पांडे त्याने 13 चेंडूत १० धावा केल्या. तर विजयने २१ चेंडूत १६ धावा केल्या.

अखेर मोहम्मद नबी आणि युसूफ पठाण यांनी हैदराबादला विजय मिळवून दिला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *