Thu. Jul 9th, 2020

‘Blood Mood, Super Moon, Wolf Moon’, पाहा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण

यंदाच्या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाला आज सुरुवात झाली आहे. ब्लडमून, सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण या यर्वांचा योग एकाच वेळेस आला आहे. तरीही भारतीयांना खग्रास चंद्रग्रहण आणि Blood Moon, पाहता येणार नाही. तर Super Moon चं दर्शन संध्याकाळी घेता येईल.

16 जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. 2021 पर्यंतचं हे शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण असेल. तर यापूर्वी 27 जूलै 2018 मध्ये पूर्ण चंद्रग्रहण झालं होतं.

 

चंद्रग्रहणाची वेळ

खग्रास चंद्रग्रहण – सकाळी 9 वाजून 4 मिनिटांपासून ते दूपारी 12 वाजून 21 मिनिटं.

Super Moon – 6 वाजून 39 मिनिटं.

कुठे पाहायला मिळेल चंद्रग्रहण?

खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत येतात.

हे चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभागात दिसेल.

भारतीय TV, youtube वरुन हे चंद्रग्रहण पाहू शकतात.

 

 

‘Super Blood Wolf Moon’

वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड वुल्फ मून’ या नावाने ओळखतात.

चंद्राचा रंग तांब्याप्रमाणे लालसर होत असल्याने त्याला ‘ब्लड वुल्फ मून’ असे म्हणतात.

चंद्रावर सुर्याची किरणं थेट पडण्यास अडथळा निर्माण होतो. कारण पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामधून जात असते.

पृथ्वीच्या कडातून सुर्याची काही किरणं चंद्रावर पडल्यामुळे चंद्र लालसर भासतो.

त्यामुळे याला ‘सूपर ब्लड मून’ असे म्हणतात.

पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात.

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ अल्याने चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा आणि प्रकाशमान दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *