Mon. Jan 24th, 2022

‘सुपर डान्सर चॅप्टर 4मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा होणार जज!

कोरोनामुळे अनेक टीव्ही शोचा सेट अन्य राज्यांत हलवण्यात आला आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ (Super Dancer 4 )या शोचे शूटिंगही दमणला होते आहे. मात्र या रिअॅलिटी शोबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा धोका बघता, शिल्पा शेट्टी व दिग्दर्शक अनुराग बासू यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. अनुराग व शिल्पा यांच्या गैरहजेरीत रेमो डिसुजा व फराह खान यांनी शो जज केला होते. आता शोच्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग दमणला होणार आहे. रिपोर्टनुसार, अनुराग बासू शो ज्वाईन करणार तर शिल्पा शेट्टी आणखी काही दिवस हा शो ज्वाईन न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्यामुळे तिच्या जागी आता मलायका अरोरा ही या शोमध्ये जज म्हणून असणार आहे. शोचे निर्माते रंजीत ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा ही शो जज करू शकणार नाही आहे. त्यामुळे आम्ही मलायकाची निवड केली आहे. येत्या काळात टेरेन्स लुईसही काही एपिसोडसाठी या शोमध्ये जज म्हणून झळकणार आहे. रंजीत ठाकूर यांनी शूटींगबाबत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, आमची संपूर्ण टीम इथे आहे आणि प्रत्येकाची कोरोना टेस्ट होत आहे. संपूर्ण सावधगिरी बाळगून आम्ही शूटींग करत आहोत. शोचे जज मुंबईवरून दमणला पोहोचल्यावर त्यांचीही कोरोना टेस्ट होईल. हा अतिशय कठीण काळ आहे. आम्ही कमीत कमी लोकांमध्ये शूटींग करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *