Fri. Sep 30th, 2022

पृथ्वीपेक्षा 3 पट जास्त वजनी असणारी Super Earth, आपल्या तार्‍याभोवती 2.4 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो

शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या सुपर पृथ्वीचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ३ पट वजनी आहे . शिवाय हा ग्रह रेड ड्वार्फ स्टार (Red Dwarf Star) ताराभोवती फिरत आहे. (Super Earth, ) ला स्वतःच्या तार्याभोवती फिरायला 2.4 दिवस लागतात. तर पृथ्वीला सुर्याची एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. हा ग्रह पृथ्वीपासून 36 प्रकाश वर्षे दूर आहे. या ग्रहाला (GJ740) नाव देण्यात आलं आहे. या ग्रहावरचे तापमान फार उष्ण आहे. इन्स्टिट्यूट डे एस्ट्रोफिजिका डे कैरेनियास (IAC) चे पोस्ट डॉक्टोरल रिसर्चर बोर्जा तोलेडो पैड्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार सुपर अर्थाचे तापमान आपल्या सूर्याच्या तापमानापेक्षा सुमारे 2000 अंश कमी आहे. शिवाय आपण याला दुर्बिणींमधून पाहू शकतो .शिवाय असा प्रथमच सुपर अर्थ सापडला आहे की, जो कमीतकमी वेळेत सूर्याची एक फेरी पूर्ण करतो. याशिवाय काही दिवसांपूर्वी आणखी एक ग्रह असा सापडला, जो 9 वर्षात आपल्या सूर्याची एक फेरी पूर्ण करतो.

हा सर्वात मोठा कालावधी आहे. या ग्रहाचे वजन हे पृथ्वीपेक्षा 100 पट जास्त आहे. बोर्जा यांनी केलेले संशोधन अॅस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स या जर्नलमध्येही प्रकाशित झालेले आहे. आतापर्यंत केपलर मिशनने 156 नवीन ग्रह शोधले आहेत. त्यापैकी बहुतेकजण शीत तारेभोवती फिरत आहेत. म्हणजे या ग्रहाचे सूर्य हे थंड झाले आहे. ( GJ740) सुपर अर्थ शोधण्यासाठी रेडियल वेलोसिटी टेक्नोलॉजी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या तंत्रज्ञानामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीची तपासणी ही स्पेक्ट्रोस्कोपिक पद्धतीने केली जाते. शिवाय यामधून ग्रहाचे आकार आणि वजन देखील दर्शविले जाते. 1998 मध्ये प्रथम रेडियल वेलोसिटी टेक्नोलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत 116 एक्सोप्लेट्स सापडले आहेत. हे तंत्र फार अचूक आणि गुंतागुंतीचे आहे त्यामुळे शास्त्रज्ञ ह्या तंत्राचा वापर करायला मागेपुढे बघतात. या तंत्राद्वारे आपण कोणत्याही ग्रहाचे वजन काढून टाकू शकतो. समस्या केवळ मॅपिंगमध्ये येते कारण प्रत्येक ग्रहाला एक चुंबकीय क्षेत्र असते, जो या तंत्रज्ञानामध्ये अडथळा निर्माण करतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.