Mon. May 17th, 2021

उन्नाव प्रकरणी 7 दिवसात चौकशी 45 दिवसात निर्णय – सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालाने गंभीर दखल घेत या प्रकरणावर तीन वेळा सुनावणी केली असून याप्रकरणाची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडीतेचा अपघात झाला यामध्ये तिच्या नातेनाईकांचा मृत्यू झाला तर ती आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

हा अपघात की घातपात अशी चर्चा सर्वत्र होत आहे. सर्वोच्च न्यायालाने गंभीर दखल घेत या प्रकरणावर तीन वेळा सुनावणी केली आहे. तसेच 7 दिवसात याप्रकरणाची चौकशी करत 45 दिवसात निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाचे आदेश

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेत भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असल्याची तक्रार पीडीतीने केली होती.

यानंतर बलात्काराच्या घटनेतील पीडितेला न्यायासाठी अनेक गोष्टींना सामोर जावं लागलं आहे. काहूी दिवसांपूर्वी पीडीतेचा अपघात झाला.

या उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. पीडित मुलीने 12 जुलै रोजी सरन्यायाधीशांना पत्र पाठवलं होतं. ते ही त्यांना मिळालं नाही.

यामुळे सर्वोच्च न्यायालाने गंभीर दखल घेत या प्रकरणावर तीन वेळा सुनावणी केली असून याप्रकरणाची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.

पीडितेला शुक्रवारपर्यंत 25 लाख रुपये देण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आले आहेत.

पीडितेवर लखनऊमध्ये उपचार होत नसतील तर तिला एम्समध्ये शिफ्ट करण्यासाठी कुटुंबीयांना विचारूनच निर्णय घ्यावा असेही आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *