राज्यातील सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय उद्या पर्यंत राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालय मंगळवारी 26 नोव्हेंबरला 10.30 वाजता अंतिम निर्णय देणार आहे. राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडे दहा वाजता युक्तिवादाला सुरुवात झाली होती.
सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही पक्षाच्या वकिलांनी जवळपास दीड तास बाजू मांडली. या दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.
सत्तासंघर्षावर आज अंतिम निर्णय येईल, अशी आशा होती. परंतु मंगळवार पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवल्याने आणखी एक दिवस निकालाची वाट पाहावी लागणार आहे.