Mon. Jul 22nd, 2019

केंद्र सरकारला कोर्टाचा धक्का; पशूंच्या खरेदी-विक्रीवरील बंदीला स्थगिती

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पशूंच्या खरेदी-विक्रीवरील बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालावी असा निर्णय सरकारने दिला होता.

 

मात्र, सरकारच्या या निर्णयावर दाखल याचिकेवर  मद्रास हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे.

 

कोर्टाच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला धक्का बसला आहे. कोर्टाच्या या स्थगितीमुळे सरकारला पुन्हा आपल्या भूमिकेवर विचार करावा लागणार आहे.

 

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या निर्णयात बदल करणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

 

या निर्णयाला स्थगिती दिल्यानं त्याची अंमलबजावणी होणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: