Tue. Aug 20th, 2019

SCचा राहुल गांधींना मोठा दिलासा; दुहेरी नागरिकत्व याचिक फेटाळली

0Shares

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. युनाइटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेद्वारे ही याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली असून ही याचिका फेटाळली आहे. यामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

राहुल गांधींकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचे चर्चा सुरू होती.

युनाइटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेद्वारे राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकेवर सुनावणी झाली.

गृहमंत्रालयाने कारवाई करावी तर राहुल गांधी निवडणूक लढण्यास अपात्र असून मतदार यादीतून नाव हटवण्यात यावे असे याचिकेत म्हटलं.

तसेच भाजपा नेते सुब्रहण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली.

राहुल गांधी यांनी १५ दिवसात उत्तर द्यावे असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *