Tue. Sep 28th, 2021

शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टात स्थगित, पुढील सुनावणी सोमवारी

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच हा वाढत चालला आहेे. दरम्यान काल झालेल्या शपथविधी विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी आज सकाळी होणार होती. मात्र ही सुनावणी तुर्तास स्थगित केली आहे. आता ही सुनावणी सोमवारी सकाळी 10.30 वाजता होणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत वकिलांनी अनेक मुद्दे कोर्टासमोर मांडले.

आज नेमकं काय घडलं ?

देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करताना कोणती कागदपत्रं दिली, असा सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांकडे समर्थक आमदारांची यादीच नाही. बहुमत आहे तर सिद्ध का करत नाहीत. आजच बहुमत सिद्ध करायला सांगा. असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी मांडला.

 तसेच कॉंग्रेसचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी मध्यरात्री राष्ट्रपती राजवट कशी हटविली? राज्यपालांनी निकष पाळले नाही. अशाप्रकारचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच गुप्त मतदान नको थेट मतदान घेण्याची मागणी सिंघवी यांनी केली.

यासर्व आरोपांवर राज्यपालांचे वकील मुकुल रोहतगी हे भाजपाची पाठराखण करत विरोधकांची याचिका फेटाळा. कोर्ट राज्यपालांना आदेश देवू शकत नाही. असा दावा त्यांनी केला. तसेच याआधी 3 आठवडे विरोधक कुठे होते? असा सवाल विरोधकांना उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *