Sat. Apr 20th, 2019

लग्नाचं अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर बलात्कारचं – सुप्रीम कोर्ट

130Shares

एखाद्या महिलेला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले तर हा सुद्दा बलात्कारचं होवू शकतो असा निर्णय सुप्रीम कार्टाने घेतला आहे.छत्तीसगढमधील एका डॉक्टरच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कार्टाने हा निर्णय घेतला आहे.लग्नाचे अमिष दाखवून फसवल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्तीसगढमध्ये डॉक्टरविरोधात पीडीत महिलेने तक्रार दाखल केली होती.

2009 सालापासून पीडीत महिला आणि डॉक्टर हे एकमेकांच्या संपर्कात होते.

डॉक्टरने लग्नाचं आश्वासनही दिल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्या या प्रेमसंबंधांबद्दल माहिती होती.

परंतु डॉक्टरने दुसऱ्याच महिलेसोबत लग्न केल्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

त्यानंतर आरोपीने दुसऱ्याच महिलेसोबत लग्न केलं. पीडीत महिलेने डॉक्टरविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणं हा बलात्कारच आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *