Tue. Jun 18th, 2019

निवडणूक बॉण्डसमधून मिळणाऱ्या देणग्यांची माहिती दया – सुप्रीम कोर्ट

13Shares

राजकीय पक्षांना निवडणूक बॉण्डसच्या माध्यमांतून १५ मे पर्यंत मिळणाऱ्या देणग्यांची माहिती 30 मे पर्यंत निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या बॉण्ड्सच्या वैधतेबाबात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावनी दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली होती. यावर हि सुनावणी झाली आहे.

नेमक प्रकरण काय?

निवडणूक बॉण्ड्सच्या वैधतेबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली होती.

या याचिकेत त्यावर बंदी घालण्यात यावी किंवा यातील दात्यांची नावे सार्वजनिक करण्यात यावीत असं म्हटलं आहे.

15 मे पर्यंत राजकिय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हि माहिती ३० मे पर्यंत एका बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावी असं सांगण्यात आलं आहे.

13Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *