Fri. Apr 19th, 2019

‘चौकीदार चोर है’ साठी राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

153Shares

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर ‘चौकीदार चोर है’ हा नारा देत नेहमी टीका केली आहे.यावर भाजपाने चौकीदार मोहीम देखील सोशल मीडीयावरती चालवली आहे.राफेल खरेदी प्रकरणी फेरतपासणी करावी असे आदेश कोर्टाने दिले होते.यावर ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयाने सुद्दा मान्य केले आहे. असे वक्तव्य राहूल गांधी यांनी केले होते, यावर सुप्रीम कोर्टाने ‘येत्या २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ अशी नोटीस बजावली आहे.

न्यायालयाची राहुल गांधींना नोटीस

‘चौकीदार चोर है’ हा नारा देत राहुल गांधी यांनी नेहमीचं लक्ष केलं आहे.

राफेल प्रकरणी पत्रकार परिषद घेवून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

‘राफेल’ प्रकरणी नवी माहिती समोर आली असल्याने फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आला.

यावर ‘चौकीदार चोर है’ हे न्यायालयानंही मान्य केलं आहे असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

याप्रकरणी भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी तक्रार दाखल केली होती.

‘राहुल स्वत:ची मतं सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत.असं न्यायालयानं म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला असल्याचं ही सांगण्यात आलं आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली.

येत्या २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ अशी नोटीस राहुल यांना बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *