Wed. Aug 21st, 2019

तिहेरी तलाकवर बंदी…

0Shares

 वृत्तसंस्था , नवी दिल्ली

तिहेरी तलाक निर्णयाबाबत सर्वांच्याच नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागून होत्या. त्याबाबत आज निर्णय घेण्यात आला आहे.

5 पैकी 3 न्यायाधीशांनी तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असून तिहेरी तलाकवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्र

सरकारला कायदा बनवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

 

तिहेरी तलाक पद्धती वैध असल्याचे सरकार मानत नाही असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. या

प्रकरणी सुप्रीम कोर्टात 11 ते 18 मेपर्यंत सुनावणी झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

 

तिहेरी तलाकबाबत  जे. एस खेहर यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशांची नेमणूक करण्यात

आली होती. विवाहसंबंध अशा प्रकारे संपवला जाऊ शकत नाही असे निरीक्षण  त्यांनी नोंदविले होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *