Sun. Jun 20th, 2021

अमित शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे

दिल्लीच्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे. या घटनेत ‘ब्रँड भारत’ ला धक्का बसला असून प्रेसिडेंट ट्रम्प यांची भारत भेट सुरू असताना इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे. ‘अतिथी देवो भवः’ ही भारताची संस्कृती असताना अशा प्रकारची घटना ही धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात देशाच्या गृहमंत्र्यांची त्यांच्या कामाची सविस्तर चौकशी प्रधानमंत्री कार्यालयांतर्गत व्हायला हवी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्याचबरोबर दोषींवर कारवाई व्हावी आणि इंटेलिजन्स लॅप्सची जबाबदारी म्हणून अमित शहा यांनी त्वरित राजीनामा देणं गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“आधीचं सरकार गेले पाच वर्ष पारदर्शक हा शब्द वारंवार वापरत आला आहे त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भात माहिती देण्यास त्यांना कुठलीही अडचण नसावी असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे

“आघाडी सरकार हे कार्यक्षम सरकार असून महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये अधिकाधिक जबाबदारपणे प्राधान्य देऊन नवीन नवीन कायदे काढतील, असा विश्वास वाटतो” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी आज जळगाव दौऱ्यादरम्यान व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *