Fri. Aug 6th, 2021

सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित – चंद्रकांतदादा पाटील

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार टीका होत असल्याचे दिसत आहे. सांगली येथील प्रचारसभेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचे म्हटलं आहे. संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलत असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांतदादा पाटील ?

लोकसभा निवडणुकींसाठी नेते प्रचारसभा घेत आहेत.
सांगली येथे आयोजीत केलेल्या एका प्रचारसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा नक्कीच पराभव होणार असे चित्र दिसत असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.
म्हणूनच मुलीच्या विजयासाठी शरद पवारांना जास्त वेळ द्यावा लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
शरद पवारांना आधी मुलगी मग नंतर बाकीचे उमेदवार अशी वेळ त्यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची निवडणूक लढवावी असेही त्यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *