Sun. Apr 5th, 2020

माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा – सुप्रिया सुळे

माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा असं आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. सोलापुरात संवाद यात्रा झाली. या दरम्यान सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी सरकारला असं आव्हान दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. याचनिमीत्ताने सुप्रिया सुळे देखील सोलापूरमध्ये आल्या आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

मी म्हणते की मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी, मी चँलेज देते. मी जर काही केलंच नाही तर मला कशाची नोटीस पाठवणार. सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र शेवटी मीच जिंकणार, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला आव्हान दिलं आहे.

गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहीनूर प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्यात आली. त्यांनी लोकसभा निवडणूकीत लाव रे तो व्हिडीओमुळे राज ठाकरेंना सरकारने टार्गेट केल्याची टीका होत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *