Sat. Aug 17th, 2019

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी दर्शवली राजीनाम्याची तयारी

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

आठवडाभरात लागोपाठ झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी स्वीकारली आहे. रेल्वेचे वाढते अपघात पाहता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश

प्रभूंनी राजीनाम्याची तयारी दाखवली. याप्रकरणी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

याआधी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी राजीनामा दिला. गेल्या सात दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन रेल्वे अपघात झाले, तर बुधवारी औरेया जिल्ह्यात

कैफियत एक्स्प्रेस रुळावरून घसरली. या अपघातात 70 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. 

त्याआधी मुजफ्फरनगरमध्ये खतौली भागात उत्कल एक्स्प्रेस रुळावरून घसरून 20 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असुन त्या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले

होते. खतौलीत झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

सुरेश प्रभू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपला राजीनामा सुपुर्द केला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *