ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण

ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण सोमवारी पुर्ण झाले. तीन दिवसानंतर सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. मशीद की मंदिर या संशोधनासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेत व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्यात आलं. हे सर्वेक्षण आज पूर्ण झाला असून एका विहीरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षाचे वकिल विष्णी जैन यांनी दावा केला आहे. तसेच याच्या संरक्षणासाठी आम्ही दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.
दरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू असून याआधी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या भिंतीवर स्वस्तिकाच्या खुना आढळून आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाल्यावर काही काळ सर्वेक्षण थांबवण्यात आले होते. न्यायालयाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्यात आले.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयातही गेलं. आधीच त्यावर सुनावणी सुरु होती. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर ती जागा तत्काळ सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले आहे. या ठिकाणी कुणालाही प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरक्षेची जवाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सीआरपीएफची असेल. वजु करण्यासही बंदी असेल.
ज्ञानव्यापी मशिदीच्यासर्व्हे दरम्यान सापडलेले शिवलिंग हे नंदीमुखी असल्याचं वकील मदन मोहन यादव यांनी सांगितलं असून त्याची लांबी १२ फूट आहे असंही ते म्हणाले. दरम्यान सर्व्हे सुरू असताना कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती.