प्रणिती शिंदेंना भाजपकडून अनेकवेळा ऑफर – सुशीलकुमार शिंदें

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून अनेकदा ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. तर जीव जाईपर्यंत प्रणिती काँग्रेसमध्येच राहील, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदें यांनी व्यक्त केला आहे. आमच्या रक्तातच काँग्रेस असून, जियेंगे या मरेंगे वो काँग्रेस के साथही, असेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने अनेक राजकीय नेते पक्षांतर होत आहे. गेल्या काही दिवसात काँगेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचे भाजप प्रवेश झाले आहेत.त्यामुळे सुशीलकुमार शिंदे या खुलाशाला महत्व आले आहे.

काँगेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चा

गेल्या काही दिवसात काँगेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचे भाजप प्रवेश झाले आहेत.

काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला सर्वात मोठा धक्का देण्यात भाजपाला यश आले आहे.

यानंतर काँगेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

आमदार प्रणिती शिंदेंना सुद्धा भाजपने कितीतरी वेळा भाजपने ऑफर दिली होती

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे.

मात्र प्रणिती शिंदे जीव जाईपर्यंत काँग्रेस मध्येच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

Exit mobile version