Mon. Aug 26th, 2019

सुषमा यांच्या पतीने लिहिलेले निवृत्तीनंतरचे पत्र व्हायरल; काय लिहिले पत्रात ?

0Shares

भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वयाच्या 67 वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुषमा यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे दुख:द निधन झाले. सगळ्यांच्या लाडक्या सुषमा स्वराज यांच्या पतीने सुद्धा एक पत्र लिहिलेले आहे. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांचा प्रेमविवाह झाला आहे. कॉलेजमध्ये असताना दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर एकामेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुषमा स्वराज यांच्या निवृत्तीनंतर पती स्वराज कौशल यांनी पत्नीसाठी लिहिलेले पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे.

सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची लव्ह स्टोरी –

पंजाबच्या चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची भेट झाली.

भेटीगाठी वाढल्यानंतर सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल एकमेकांच्या प्रेमात पडले.

लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 13 जुलै 1975 रोजी लग्न बंधनात अडकले.

सुषमा स्वराज यांच्या पतीने काय लिहिले पत्रात ?

मॅडम सुषमा स्वराज – धन्यवाद तुम्ही यंदा निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही घेतला.

ज्या पद्धतीने मिल्खा सिंग यांनी न धावण्याचा निर्णय घेतला त्याची मला आज आठवण झाली.

राजकीय मॅरेथॉन 1977 पासून सुरु झाली म्हणजेच 41 वर्षापासून सुरु झाली आहे.

आतापर्यंत तू 11 निवडणुका लढली आहेस. विषेश म्हणजे आतापर्यंत तू 1977 पासून निवडणूक लढत आली आहे.

फक्त 1991 आणि 2004 साली तुला पक्षाने निवडणूक लढू दिली नाही.

तू चार वेळा लोकसभा, तीन वेळा राज्यसभा आणि तीन वेळा विधानसभेमध्ये निवडून आली आहेस.

तू वयाच्या 25 वर्षांपासून निवडणूक लढवत आहेस.

मॅडम – मी गेल्या 46 वर्षांपासून तुमच्या मागे धावत आहे. मी आता 19 वर्षांचा तरुण नाही. मी पण आता थकलो आहे.

असे स्वराज कौशल यांनी निवृत्त होणाऱ्या पत्नीला पत्रामध्ये लिहिले आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *