Mon. Jul 22nd, 2019

पाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारत सरकारनं पाकिस्तानातील काही नागरिकांना ‘मेडिकल व्हिसा’ नाकारल्याचा कांगावा करणाऱ्या पाकवर केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज बरसल्या आहेत.

 

‘गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास भारत नेहमीच तयार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांची नावं परराष्ट्र मंत्री सरताज अझीझ यांच्याकडून कळवली

गेल्यावरच आम्ही पुढची कार्यवाही करू शकतो.

 

त्यांच्याकडून तशी शिफारसच झालेली नाही’, अशी वस्तुस्थिती सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केली. इतकंच नव्हे तर, कुलभूषण जाधवांच्या आईला व्हिसा देण्याच्या आमच्या

विनंतीपत्रावर पोचपावती देण्याचं सौजन्यही अझीझ यांनी दाखवलं नसल्याची चपराकही त्यांनी लगावली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: