Sun. Jun 20th, 2021

एका टविट् वर सुषमा स्वराज सोडवत सामान्यांच्या समस्या, हे किस्से अजुनही आठवणीत..

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्या नेहमी सज्ज असायच्या. एका टवीट्वर त्या मदतीसाठी धावून येत होत्या.त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयाला देखील त्यांच्यावर विश्वास होता. त्यांचे असे मदतीचे किस्से जगजाहीर आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. स्वराज यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे अतिशय उत्तमरित्या सांभाळली. या व्यतीरिक्त सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्या नेहमी सज्ज असायच्या. एका टवीट्वर त्या मदतीसाठी धावून येत होत्या.

ट्विटरवर अनेकांच्या समस्या एकून त्या सोडवल्या.

परराष्ट्र मंत्री असताना ट्विटरवर अनेकांच्या समस्या ऐकून त्या ताबडतोब सोडवण्याच काम सुषमा स्वराज अगदी उत्तमरित्या करत होत्या. यामु़ळेच त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहाचल्या. अडचणीत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने टविट् केले की त्या मदतीसाठी सज्ज असायच्या. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयाला देखील त्यांच्यावर विश्वास होता. त्यांचे असे मदतीचे किस्से जगजाहीर आहेत.

पत्नीचे पासपोर्ट हरवल्याने पत्नीशिवाय हनिमूनवर जावं लागलेल्या एका नवरोबाने टविट् केले होते. मदतीला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज धावून त्या नवऱ्याच्या मदतीला धावून गेल्या होत्या. त्याच्या या समस्येसाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला. त्याची ही समस्या गांभीर्याने घेवून त्यानी ती सोडवली होती.

सौदी अरेबियामध्ये कागदपत्रांच्या अडचणींमुळे एक भारतीय अडकला होता. त्याने आत्महत्या करणार असं टविट् केले होते. यावर स्वराज यांनी त्याला दिलासा दिला. ‘ऐसा नहीं सोचते, हम हैं ना या शब्दात त्यांनी त्याला धीर दिला आणि भारतीय दुतावास तुम्हाला हवी ती मदत करणार असं ही त्याला सांगितलं. आणि त्याचा जीव वाचावला. त्यामुळे त्या परराष्ट्रात असणाऱ्या भारतीयासाठी त्या दुवा म्हणून काम करत होत्या.

मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकून पाकिस्तानात गेलेल्या मूकबधीर गीता भटकर सुखरूप मायदेशात आणले. इतकच नव्हे तर मी गीताला ओझ होऊ देणार नाही. तिची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, अशी मायेची ऊबही त्यांनी गीताला दिली होती.या मुलीला मी ओझ बनू देणार नाही. तिच्या लग्नाची, शिक्षणाची सर्व जबाबदारी आम्ही घेणार आहोत, असा आधार त्यांनी दिला होता.

इराकमध्ये अडकलेल्या 39 नर्सना सुखरूप मायदेशी आणण्यामध्ये त्यांची मुत्सद्देगिरी दिसून आली. परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *