Thu. Oct 21st, 2021

‘मी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या’, न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरची कबुली

नुकत्याच घेण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असणारा शरद कळसकरने अखेर दाभोलकरांची हत्या त्याने आणि सचिन अंदुरेने केल्याचे कबूल केले आहे.

सीबीआयच्या न्यायवैद्यकीय चाचणीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येविषयी खुलासा केला आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असणारा शरद कळसकरने अखेर दाभोलकरांवर आपणच गोळ्या झाडल्याचं त्याने आणि सचिन अंदुरेने केल्याचं कबूल केलंय. याप्रकरणी वकिल संजीव पुनाळेकरांचे नाव घेत त्यांनीही या संदर्भात मदत केल्याचे शरद कळसकरने चाचणीत म्हटलंय.

न्यायवैद्यकीय चाचणीत काय म्हणाला शरद कळसकर?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी अटकेत असणारा संशयित शरद कळसकर याची CBI कडून न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली.

या चाचणीत त्याने आणि सचिन अंदुरे यांनी  आपण गोळीबार केल्याची कबुली दिली.

न्यायवैद्यकीय चाचणीचा हा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला.

या चाचणीदरम्यान कळसकरने सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांचंही नाव घेतलं.

गेल्या वर्षी पुनाळेकर वकिलांची आपण भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरलेली हत्यारं नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असंही शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत म्हटलंय.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणीच 25 मे 2019 रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करण्यात आलं आहे.

रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ केली.

फेब्रुवारी 2019 मध्ये CBI कडून विशेष न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रासोबत शरद कळसकरच्या न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आलाय.

सीबीआयचे विशेष सरकारी वकील यांनी या न्यायवैद्यकीय चाचणीच्या अहवालाचा आधार घेत मंगळवारी आपली बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *