Sat. May 25th, 2019

शिवसेनेचा सस्पेन्स!

223Shares

आज मातोश्रीवर सेनेच्या सर्व खासदारांची  बैठक झाली. विभागवार आढावा घेण्यात आला.

त्यात सर्व मुद्द्यावर चर्चा देखील झाली. पण युतीबाबत चर्चा झाली नाही, हे कारण थोडं न पटण्यासारखंच आहे.

दुसरीकडे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजप नेते सकारात्मक असल्याची स्पष्टोक्ती दानवेनी पुन्हा केलीय.

मग घोडं अडलंय कुठे?

सेनेचे वरिष्ठ नेते काहीही बोलत असले तरी शिवसेनेच्या खादारांना मात्र युती हवी आहे.

हे ते उघडपणे बोलत नसले तरी झालेल्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंवर युतीसाठी दबाव टाकत आहेत.

अंतर्गत बैठकीत युतीबाबत कुठेही भाष्य करू नका, अशी सक्त ताकीद उद्धव ठाकरेंनी खासदारांना दिलीय.

हे देखील वाचा- “महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ राहणार!”

सस्पेंस वाढवण्याचा खेळ

भाजपकडून कुठलीही ऑफर नाही.

महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असं संजय राऊत म्हणाले.

आम्हीच दिल्लीचे तख्त गाजवणार, असं बोलून राऊत यांनी युतीतला सस्पेन्स अजून वाढवला.

सस्पेन्स वाढवून ठेवणं ही शिवसेनेची जुनीच खेळी आहे.

हा खेळ खेळून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवे मनसुबे आखत असल्याचं स्पष्ट आहे.

शिवसेना हाच मोठा भाऊ असं संजय राऊत म्हणतात.

पण युती बाबत त्यांची भूमिका सस्पेन्स वाढवणारी आहे.

याच सस्पेन्सच्या बळावर शिवसेना स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न करणार, हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *