Thu. Apr 22nd, 2021

डीजीसीएचा आणखी एक नवा निर्णय ; आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थिगिती वाढवली

आंतरराष्ट्रीय विमान उडडाणांवरील स्थगिती वाढवली…

डीजीसीएचा आणखी एक नवा निर्णय घेतला आहे . भारतातून परदेशात जाणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाणं बंद असतील असं डीजीसीएनं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक आणि त्यांच्यासाठी मंजूर उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर २८ फेब्रुवारीपर्यंत स्थिगिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळं २३ मार्चपासून भारतातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद होती. मात्र, मे महिन्यांत ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत विशेष विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली असून जुलैपासून काही निवडक देशांसोबत एअर बबल करारानुसार उड्डाण केली जात आहेत.

शिवाय भारताने २४ देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. यात केनिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, ब्रिटन, भूतान, फ्रान्स यांसारख्या देशांचा समावेश आहे. एअर बबल करार हा एक प्रकारे प्रवाशी उड्डाणांसाठी खास करार केला आहे. याला एअर बबल नाव देण्यात आलं आहे. याद्वारे संबंधित देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय एअरलाईन्स उड्डाणांचे संचलन करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *