Mon. Jan 24th, 2022

रत्नागिरीच्या दापोलीत तीन वयोवृध्द महिलांचा संशयास्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत तीन वयोवृद्द महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी ही घटना घडली असून पोलिसांकडून गुन्हेगाराचा शोध सुरू आहे.

दापोलीमध्ये तीन वयोवृद्ध महिलांचा हा मृत्यू खून की आकस्मिक मृत्यू याबाबत चर्चेला उधाण आले आहे. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) व  इंदूबाई शांताराम पाटणे (८०) अशी या संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहे. मात्र, पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

परबत पाटणे यांच्या घरात वेगवेगळ्या खोलीत या तीन महिलांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये  इंदूबाई पाटणे यांचा मृतदेह हॉलमध्ये, सत्यवती यांचा बेडरूममध्ये तर पार्वती यांचा मृतदेह किचनमध्ये सापडला आहे. या तीन्ही वयोवृद्ध महिलांच्या डोक्यात वार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर डी.वाय.एस.पी व दापोलीचे पोलीस निरीक्षक दाखल झाले असून गुन्हेगाराचा शोध सुरू आहे. तर मकरसंक्रातीच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडल्यामुळे लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *