Tue. Sep 28th, 2021

राजू शेट्टी महाआघाडीसोबत लोकसभा लढणार!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला आहे .हातकणंगले मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये इस्लामपूर राष्ट्रवादीकडे, तर शिराळा भाजपकडे आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत भाजपचे आमदार आहेत.

शिरोळ, शाहुवाडी, हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 16 लाख 9 हजार एवढी आहे.या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगेसने राजू  शेट्टी यांना लोकसभा निवडणूक 2019 साठी पाठींबा जाहीर केला आहे.

राष्ट्रीवादी काँग्रेसकडे केलेल्या दोन जागांच्या मागणीवर राजू शेट्टी ठाम होते. दोन जागांवर राजू शेट्टींचं समाधान झालं असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  लोकसभा निवडणुकीत महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण कर्जमुक्ती आणी दीडपट हमीभाव हा निवडणुकीतील  कॉमन अजेंडा आहे. असं राजू शेट्टीं यांनी सांगीतलं आहे.

राजू शेट्टी महाआघाडीसोबत का?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघराजू शेट्टींचा बालेकिल्ला आहे.

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी हे 2009 पासून आतापर्यंत दोन वेळा निवडून आले आहेत.

खासदार राजू शेट्टी यांना 2014 साली 6 लाख 40 हजार मतं मिळाली होती.

लोकसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादी काँगेसने राजू शेट्टी यांना पाठींबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांना आपल्या कोट्यातून हातकणंगलेची जागाही सोडली.

काँग्रेसकडून वर्धा किंवा सांगली यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार आहे.

संपुर्ण कर्जमुक्ती आणी दीडपट हमीभाव हा निवडणुकीतील  कॉमन अजेंडा आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *