स्वामी नारायण मंदिराला धमकी पत्र; मंदिर उडवून देण्याची धमकी

धुळे शहरातील देवपूर येथील स्वामी नारायण मंदिर उडवून देण्याचे धमकी पत्र पाठण्यात आले आहे. मंदिराला दोन धमकी पत्र पाठवण्यात आले असून दोन्ही हिंदी भाषेत लिहिलेली आहेत. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या धमकी पत्रामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
धुळे शहरातील देवपूर येथील स्वामीनारायण मंदिर उडवून देणार असल्याचे धमकी पत्र पाठवण्यात आले आहे.
मात्र हे धमकी पत्र खोटं असून खोडसाळपणा असण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.
मंदिराला दोन धमकी पत्र पाठवण्यात आले असून दोन्ही हिंदी भाषेत लिहिलेली आहेत.
तसेच देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाने बॉम्ब शोधक पथकाच्या साहय्याने मंदिर परिसरात शोधमोहिम सुरू केले.
तसेच पोलीस सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आले आहे.
भाविकांची तपासणी करुनच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस प्रशासन या पत्राची सखोल चौकशी करणार आहेत.
संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी मंदीराची पाहणी केली आहे.