Wed. Dec 11th, 2019

‘बिग बॉस’मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम सायकल चोर, क्राइम ब्रॅँचने ठोकल्या बेड्या

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोचा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक ठरलेल्या स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यास दिल्लीच्या इंटर स्टेस सेल क्राइम ब्रॅँचने अटक केली. स्वामी ओमला भजनपुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं.

 

स्वामी ओम याच्याविरोधात दिल्लीत सायकल चोरीचा आरोपही आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 11 सायकली चोरल्याचा गुन्हा स्वामी ओमवर दाखल करण्यात आला.

 

धक्कादायक बाब म्हणजे त्याचाच सख्खा भाऊ प्रमोद यांनी त्याच्यावर सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे, तर दिल्लीतील विविध भागांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *