Wed. May 18th, 2022

स्वर्णव सापडला, मात्र रस्ते अपघातात आत्याचा मृत्यू

बाणेर येथील अपहरण झालेला मुलगा स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी परतल्याची बातमी मिळाल्यानंतर बुधवारी रात्रीच नांदेडवरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सुनीता संतोष राठोड चव्हाण असे यांचे नाव असून त्या ३६ वयाच्या होत्या. नगर महामार्गावरील अपघातात त्यांच्या मृत्यू झाला असून दोन मुले आणि पती गंभीर जखमी झाले आहेत.

समर राठोड (वय १४) आणि अमन राठोड (वय ६) असे या दोन मुलांची नावे असून अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बुधवारीच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय आणि बाणेर परिसरात साजरा केला जात होता. मात्र या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली आहे.

1 thought on “स्वर्णव सापडला, मात्र रस्ते अपघातात आत्याचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.