Wed. Jan 19th, 2022

स्वत:च आपले दात आपल्या घशात घातले – आशिष शेलार

  जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळीत वाढ झाली असल्याचा अहवाल ठाकरे सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे. यावरून ‘जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाविकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वत:च आपले दात आपल्या घशात घातले, अशी प्रतिक्राया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

  राज्यसरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला शेलारांनी आघाडी सरकारला लगावला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी या योजनेच्या कामात गुणवत्ता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, परादर्शकता नाही, असे आघाडीकडून आरोप करण्यात आले होते, असे आशिष शेलार म्हणाले.

  मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तरे दिली? जलयुक्त शिवारामुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लगवडीसाठी क्षेत्रफळ वाढले, पाण्याची पातळी वाढली या सर्व गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि रोजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केले हे सिद्ध होते, असे आशिष शेलार यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *