Mon. Jan 17th, 2022

यंदा बाप्पाला रवा खोबऱ्याच्या मोदकाचं नैवेद्य जरूर दाखवा

आपण बाप्पाला नवैद्य म्हणून उकडीचे मोदक दाखवतो. मोदकांमध्ये बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तळलेले मोदक, रव्याचे मोदक, चॉकलेट मोदक, माव्याचे मोदक, मनुक्याचे मोदक, काजूचे मोदक इत्यादी. आता नारळ आणि रव्याचे मोदकही बनवून पाहा. हे खायला देखील खूप चविष्ट आहेत. मग यंदा आपल्या बाप्पाला नारळ आणि रव्याच्या मोदकाचा नैवेदय जरूर दाखवा.

साहित्य:-

रवा – 1 कप

साखर – 1 कप

किसलेले नारळ – ½ कप

तूप – 2 मोठे चमचा

पिस्ता – 5 ते 10

वेलची पावडर

पिवळा रंग – किंचित

पाणी आवश्यकतेनुसार

कृती:-

  • प्रथम एका कढईत तूप गरम करून घ्या. त्यात रवा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • नंतर त्यात नारळाचा किस टाकून ते लालसर होईपर्यंत भाजा.
  • दूसऱ्या पॅनमध्ये साखर घाला. नंतर थोडं पाणी घालून त्याचा घट्ट पाक तयार करा.
  • खायचा रंग टाका. मग वेलची पावडर घालून त्यात नारळाचा किस टाका. आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे मोदक बनवा. वरून एक पिस्ता मोदकावर लावा.

अशा प्रकारे चविष्ट नारळ आणि रव्याचा मोदक प्रसाद तयार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *