Wed. Jan 19th, 2022

रत्नागिरी राज्य मार्गावरील येणपे तालुका कराड येथे अपघात

कराड : महाबळेश्वरमधील पसरणी घाटातील अपघाताची घटना ताजी असतानाच, राज्यात आणखी एका अपघाताची घटना घडली आहे. स्वीफ्ट गाडीने एसटीला धडक दिली आहे.

या अपघातात एकूण तीन जण गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात स्वीफ्ट कारमधील एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील एकमेव मृताचे विजया विनायक नाईक असे नाव आहे.

रत्नागिरी राज्य महामार्गावरील येणपे तालु्क्यातील कराड येथे हा अपघात झाला आहे. कराड-शेडगेवाडी या एसटी बसला स्वीफ्ट कारने धडक दिली.

धडकेत स्वीफ्ट गाडीच्या पुढील भागचा चेंदामेंदा झाला आहे. स्वीफटमधील किर कुटुंबिय मुंबईहून रत्नागिरीला चालले होते. यावेळेस हा अपघात झाला. अपघात झालेल्या एसटी बसचा एमएच 14 बीटी 4859 असा नंबर आहे.

सदर अपघाताची नोंद कराड पोलिसात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *