Mon. Jul 22nd, 2019

नॉनव्हेज जेवण पाठल्यामुळे Zomato, Swiggyला नोटीस

94Shares

उत्तराखंड सरकारच्या अन्न आणि सुरक्षा विभागाने ऑनलाइन अन्नपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या ‘ Zomato ‘ आणि ‘Swiggy’ या कंपन्यांना नोटीस बजावली आहे.

मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात आलेल्या हरिद्वारमधील परिसरात मांसाहारी जेवण पाठवल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांना नोटिसा पाठवून उत्तर मागितले आहे.

तर हरिद्वारच्या जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हरिद्वार महापालिकेने शहराच्या हद्दीत मांसाहारी अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

मात्र ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून शहराच्या अनेक भागांत मांसाहारी जेवण पाठवण्यात येत असल्याची बाब समोर आली.

याची गंभीर दखल घेऊन सरकारच्या अन्न व सुरक्षा विभागाने Zomato आणि Swiggy या कंपन्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

‘स्थानिकांच्या तक्रारींवरून अन्न व सुरक्षा विभागाकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Zomato आणि Swiggy या कंपन्यांनी विभागाच्या पथकासमोर ‘एफएसएसएआय’चे प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच उत्तर देण्यासाठी त्यांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे,’ अशी माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणी Zomato आणि Swiggy या दोन्ही कंपन्यांनी आपली बाजू मांडली आहे.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही ‘एफएसएसएआय’च्या मानकांनुसार काम करत आहोत.

धार्मिक भावनांचा आदर करून आणि नियमांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे Zomatoने म्हटले आहे. तर चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.

नोटीस मिळाल्यानंतर यासंबंधी कार्यवाही केली आहे. 16 मार्चपासून आम्ही हरिद्वारमध्ये केवळ शाकाहारी जेवणाची डिलिव्हरी करत आहोत.

Swiggyकडे एफएसएसएआयचा परवाना आहे, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

 

94Shares

Leave a Reply

%d bloggers like this: