स्वाईन फ्लूला अटकाव करणारी नवीन लस लवकरच भारतात
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
स्वाईन फ्लूला अटकाव करण्यासाठी नवीन लस भारतासाठी देण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला. ही नवीन लस जून महिन्यात येणार आहे.
तापमानात बदल होत असल्याने स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली. दरम्यान हा फ्लू नेमका कोणत्या कारणांमुळे पसरतो, त्याची लक्षणे कोणती, याचा अभ्यास करुन त्यानुसार लसीमध्ये बदल करण्यात येतात.
गरोदर माता, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, उच्चरक्तदाब ज्यांना आहे तसंच ज्यांना डायबेटिसचा आजार आहे अशांना स्वाइन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते अशा गटातील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून त्यांना लसीकरण करण्यात येते.